शिक्षणसेवकांना कायम सेवेत घेण्याची मागणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 September 2012

शिक्षणसेवकांना कायम सेवेत घेण्याची मागणी


शिक्षणसेवकांना कायम सेवेत घेण्याची मागणी
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळांमध्ये नियुक्त केलेल्या शिक्षणसेवकांना देण्यात येणारे तुटपुंजे वेतन (मानधन) ही प्रत्येक महिन्यात मिळत नसल्याने शिक्षणसेवकांना अनेक हालअपेष्टांना सामोरे जावे लागत आहे. दीर्घ सुट्टीचा पगार, वैद्यकीय फायद्यांपासूनही पालिका प्रशासनाने शिक्षणसेवकांना वंचित ठेवले आहे. त्यामुळे सर्वच बाबतींत होणारी फरफट आणि अन्याय दूर करून शिक्षणसेवक पद रद्द करून आम्हाला कायम सेवेत सामावून घ्या, अशी आग्रही मागणी शिक्षणसेवकांनी एक लेखी निवेदनाद्वारे पालिका आयुक्तांकडे केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS