ही तर अजित पवारांची नौटंकी - राज ठाकरे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

ही तर अजित पवारांची नौटंकी - राज ठाकरे

Share This
उपमुख्यंमत्री अजित पवार यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर राज्यातील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे. विरोधी पक्षातील काही नेत्यांनी अजित पवार यांच्या या तडकाफडकी निर्णयाच्या खरेपणावरच शंका घेतली आहे तर काहींनी याला नौटंकी म्हणत यातलं गांभिर्यच काढून टाकले आहे. 

अजित पवार यांचा राजीनामा ही केवळ नौटंकी असल्याची प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे. तर अजित पवार यांनी दिलेला राजीनामा मुख्यमत्र्यांनी मंजूर करून दाखवावा असं आवाहन शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना केलं आहे. 

दरम्यान, अजित पवार यांच्या राजीनाम्याचं भाजपनं स्वागत केलं. आहे. 'ही चांगली गोष्ट असून त्यांनी राजीनाम्यावर कायम राहून तो परत घेऊ नये' असं भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages