सिंचन प्रकल्पातील घोटाळ्यांच्याआरोपामुळं व्यथित होऊन राज्याचे उपमुख्यमंत्रीआणि ऊर्जामंत्री अजित पवार यांनी आज आपल्यापदाचा तडकाफडकी राजीनामा दिला . माझ्यावर आरोपअसताना मी या पदावर राहणे योग्य नाही , असंपवार यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडेपाठविलेल्या राजीनामापत्रात म्हटलं आहे
राज्यभरातील विविध सिंचन प्रकल्पातील कोट्यवधीरुपयांच्या घोटाळ्यात अजित पवार यांचे नाव गोवलेजात असताना आज , मंगळवारी या घोटाळ्याचीचौकशी करण्यासंदर्भात जनहित याचिका दाखलकरण्यात आली होती . विविध माध्यमांद्वारेमाझ्याविरुद्ध बदनामीची मोहीम राबविली जात असूनया प्रकरणाची निःपक्षपातीपणे चौकशी व्हावी यासाठीआपण पदाचा राजीनामा देत असल्याचे पवार यांनीमुंबईत एका भरगच्च पत्रकार परिषदेत जाहीर केलं .अर्थ खात्याचा कारभार जयंत पाटील तर ऊर्जा खात्याचा कारभार राजेश टोपे यांच्याकडे सोपविण्याची मुख्यमंत्र्यांना विनंती केली असल्याचं पवार यांनी सांगितलं.
' मेटा ' चे मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी जलसंपदा खात्यात सुरु असलेल्या भ्रष्टाचाराबद्दल सर्वअभियंत्यांना पत्र लिहिले आहे . राजीनाम्यामागे पत्र हेच केवळ कारण नसल्याचं पवार यांनी स्पष्टकेलं . राजीनाम्याविषयी आपण राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा केली होती .त्यांची संमती घेतल्यानंतर हा निर्णय जाहीर केला असल्याचे अजित पवार म्हणाले .
दरम्यान , अजित पवार यांच्या यांच्या निर्णयामुळं राष्ट्रवादीच्या आमदारांना धक्का बसला आहे . दादामंत्रिमंडळात नसताना आम्ही काय करणार असं सांगत राष्ट्रवादी कॉंग्रेसने सत्तेतून बाहेर पडावं अशीमागणी काही आमदारांनी केली आहे .


No comments:
Post a Comment