टीटीएफ मुंबई दिवाळी पर्यटन महोत्सव - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 September 2012

टीटीएफ मुंबई दिवाळी पर्यटन महोत्सव

टीटीएफ मुंबई दिवाळी पर्यटन महोत्सव
मुंबई-  दिवाळीच्या सुट्टीसाठी सज्ज झालेल्या मुंबईकरांनी आपल्या सहलीचे नियोजन करण्यासंदर्भात भारताच्या सर्वात मोठ्या पर्यटनविषयक ' ट्रॅव्हल अँड टूरिझम फेअर (टीटीएफ) या प्रदर्शनाला भेट दिली. हे प्रदर्शन 7 ते 9 सप्टेंबर या कालावधीत नेहरुसेंटर येथे भरविण्यात आले आहे. 1989 पासून टीटीएफ हे सहल आणि पर्यटन उद्योगातील भारताचे अग्रणी प्रदर्शन म्हणून ओळखले जाते. देश-विदेशातील पर्यटन संस्थांना आपल्या सेवा आणि उत्पादने सादर करण्याची वार्षिक संधी टीटीएफच्या वतीने दिली जाते.

टीटीएफ मुंबई 2012 दिवाळी आवृत्तीमध्ये राष्ट्रीय / प्रादेशिक पर्यंटन संस्था, राज्य सरकारचा पर्यटन विभाग, सहल आयोजक, पर्यटन प्रतिनिधी, हॉटेल्स, रिसॉर्ट, साहसी पर्यटन, भाडेतत्वावरील कार, रेल्वे, कोज ऑपरेटर अशा 150 पेक्षाही अधिक संस्था सहभागी होणार आहेत. शेकडो पर्यटनस्थळांची माहिती, पॅकेज आणि अनेक पर्याय टीटीएफला भेट देणा-या लोकांसाठी उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे सर्वोत्तम
पर्याय आणि पॅकेज या ठिकाणी मिळणार आहे.

600 लाख देशांतर्गत पर्यटन सहलींचे आयोजन करून देशांतर्गत सहली या भारतीय पर्यटन उद्योगाचा महत्त्वाचा कणा बनला आहे. परदेश पर्यटनाच्या संख्येमध्ये देखील वार्षिक 15 टक्के वाढत असून जवळपास 12 लाख भारतीय नागरिकांनी मागील वर्षी परदेश पर्यंटन केले आहे. त्या तुलनेत देशांतर्गत पर्यटनामध्ये मागील वर्षी 6.8 लाखांनी वाढ झाली आहे. त्यामध्ये वार्षिक 6.6 टक्के वाढ होत आहे. भारतामधील पर्यटन उद्योग हा सर्वात मोठी सेवा उद्योग आहे. राष्ट्रीय जीडीपीमध्ये या उद्योगाचा 6.23 टक्के सहभाग होतो. आणि भारतातील एकूण रोजगाराच्या 8.78 टक्के रोजगार या उद्योगामध्ये आहे. जम्मू काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, केरळ आदी भारतामधील राज्ये ही पर्यटनावर जास्तीतजास्त अवलंबून असतात.

टीटीएफ चे आयोजक फेअरफेस्ट मिडिया लिमिटेडचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव अगरवाल यांच्या म्हणण्याप्रमाणे " टीटीएफ सारखे व्यासपीठ म्हणजे पर्यटन उद्योगाला चालना देणारे आहे.  सध्या जागतिक मंदीमुळे व्यवसाय थंडावले आहेत. "वर्ल्ड ट्रॅव्हल अँड टूरिझम कौन्सिल (WTTC) भारताच्या बाबतीत दिलेल्या अहवालानुसार देशाच्या जीडीपीमध्ये  पर्यटन उद्योगाच्या सहभागामध्ये 2020
पर्यंत 9 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. भारत हा प्रमुख पर्यटन केंद्र म्हणून ओळखले जाईल

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS