पीपल्सचा अध्यक्ष पदाचा दावा फोल आणि हास्यास्पद - आनंदराज आंबेडकर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 September 2012

पीपल्सचा अध्यक्ष पदाचा दावा फोल आणि हास्यास्पद - आनंदराज आंबेडकर

पीपल्सचा अध्यक्ष पदाचा दावा फोल आणि हास्यास्पद - आनंदराज  आंबेडकर 
मुंबई / अजेयकुमार जाधव 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदाचा अनधिकृत व बेकायदेशीर दावा करणाऱ्या रामदास आठवले यांचा दावा फोल आणि हास्यास्पद असल्याचे रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी म्हटले आहे.

आनंदराज आंबेडकर यांनी बुधवारी शिष्टमंडळासह अतिरिक्त पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांची भेट घेवून धर्मादाय आयुक्त, दिवाणी न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे डॉ.पी. एस. मोरे व डॉ.गायकवाड हेच अधिकृत विश्वस्त असल्याचे कृष्णप्रकाश यांच्या निदर्शनास आणले.  यावर कृष्णप्रकाश यांनी पीपल्सच्या अध्यक्षपदाचा दावा करीत असलेल्या रामदास आठवले व त्यांच्या सहकाऱ्यांवर मंगळवारी मुंबई पोलिसांनी फौजदारी दंड प्रक्रियेच्या कलम १४९ अन्वये नोटीसा दिल्याचे तसेच बेकायदेशीर व बेजबाबदार कृतीमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यांच्यावर कायदेशीर कृती करण्यात येईल असे बजावल्याचे सांगितले आहे असे शिष्टमंडळाला सांगितले  

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS