सिद्धार्थ वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे आंदोलन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 September 2012

सिद्धार्थ वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे आंदोलन

सिद्धार्थ वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे आंदोलन
मुंबई - पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वडाळा येथील सिद्धार्थ वसतिगृहाचा खंडित केलेला पाणी आणि वीजपुरवठा तत्काळ सुरू करण्याच्या मागणीसाठी सिद्धार्थ विहार विद्यार्थी कृती समितीने काल (ता.7) आझाद मैदानात आंदोलन केले. 

पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष रामदास आठवले यांनी आदेश दिल्यानंतरही संस्था प्रशासन पाणी आणि वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करीत नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. दिलीप गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. 

संस्थेच्या हलगर्जीपणामुळे वसतिगृहाचा पाणीपुरवठा आणि वीजपुरवठा खंडित केल्याचा आरोप गायकवाड यांनी केला. संचालक मंडळाच्या अकार्यक्षमतेमुळे पाण्यासारख्या मूलभूत हक्कांपासून येथील विद्यार्थी वंचित आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे, असे गायकवाड म्हणाले. याच वेळी विद्यार्थ्यांनी कायदा हातात घेतल्यास होणाऱ्या परिणामांना संचालक मंडळ जबाबदार राहील, असा इशाराही त्यांनी दिला.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS