ट्रॅव्हल ऍण्ड टुरिझम फेअर मेळ्याचे उद्‌घाटन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 September 2012

ट्रॅव्हल ऍण्ड टुरिझम फेअर मेळ्याचे उद्‌घाटन

ट्रॅव्हल ऍण्ड टुरिझम फेअर मेळ्याचे उद्‌घाटन
मुंबई - दिवाळीच्या सुटीत सहलीचे नियोजन करण्यासाठी मुंबईकरांना विविध पर्याय उपलब्ध करून देण्याच्या हेतूने ट्रॅव्हल ऍण्ड टुरिझम फेअर (टीटीएफ) आयोजित करण्यात आला आहे. वरळीतील नेहरू सेंटर येथे या मेळ्याचे आज उद्‌घाटन झाले. 

ट्रॅव्हल ऍण्ड टुरिझम फेअरचे यंदा दहावे वर्ष आहे. या मेळ्याचे उद्‌घाटन गढवाल मंडल विकास निगमचे महाव्यवस्थापक पंकज पांडे यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्र यजमान असलेल्या या मेळ्यात आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, झारखंड, केरळ आदी राज्यांप्रमाणे ब्रिटन, भूतान, चीन, दुबई, जपान, मालदीव या देशांचाही सहभाग आहे. त्यांची ऐतिहासिक, नैसर्गिक, सांस्कृतिक वैशिष्ट्ये या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. आगामी सुट्ट्यांत पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध योजनाही जाहीर केल्या जाणार आहेत. टीटीएफमध्ये देश-परदेशांतील हॉटेल, रिसॉर्ट, टुर्स ऍण्ड ट्रॅव्हल्स आदींचा समावेश आहे. तत्काळ बुकिंग करणाऱ्या पर्यटकांना सूट दिली जाणार आहे. 

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS