1 नोव्हेंबरपासून बीकेसीमध्ये गृहप्रदर्शन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

1 नोव्हेंबरपासून बीकेसीमध्ये गृहप्रदर्शन

Share This

मुंबई : एमसीएचआय केड्राई यांच्या संयुक्त विद्यमाने वांद्रे-कुर्ला संकुलामध्ये 1 नोव्हेंबरपासून प्रॉपर्टी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये मुंबई शहरातील तसेच उपनगरांमधील फ्लॅट्स, बंगले व व्यावसायिक परिसर प्रदर्शित करण्यात येणार आहे. या प्रदर्शनाला अँक्सिस बँक सहप्रायोजक आहे. 30 हजार चौ. फूट जागेमध्ये विस्तारलेल्या प्रॉपर्टी प्रदर्शनामध्ये 120 पेक्षा जास्त विकासकांद्वारे 15000 पेक्षा जास्त प्रॉपर्टीज् प्रदर्शित करण्यात येतील. वन बीएचके, टू बीएचके, थ्री बीएचके, फोर बीएचके, फाइव्ह बीएचके व स्टुडिओ अपार्टमेंट्स, डयुप्लेक्स, पेंटहाऊसेस, रो हाऊसेस, बंगले, याशिवाय सेकंड होम्स, एन ए प्लॉट्स, शॉप्स व कार्यालय परिसर प्रदर्शित करणार आहेत. एमसीएचआय क्रेडाईचे अध्यक्ष पारस गुंडेचा याबाबत सांगतात की, गृहखरेदीदारांचा ओढा कमी झाला होता,मात्र आता किमती स्थिर झाल्याने नवीन प्रकल्प येत असून, घरांची खरेदी करण्याची योग्य वेळ आली आहे. हे लक्षात घेऊनच वनबीएचकेपासून ते बंगले व पेंटहाऊसपर्यंतचा समावेश आहे. त्यामुळे या प्रदर्शनात सहभागी होणार्‍यांना आपले स्वप्नातील घर पाहिल्याचा आनंद होणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages