प्रवासाच्या अंतरानुसारच रिक्षा-टॅक्सीचे भाडे द्या! - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

प्रवासाच्या अंतरानुसारच रिक्षा-टॅक्सीचे भाडे द्या!

Share This

रिक्षा-टॅक्सीचे भाडे देताना प्रवाशांनी प्रवासाच्या अंतरानुसार भाडे द्यावे, त्याहून जास्त पैसे चालकाला देऊ नये, असे आवाहन मुंबई ग्राहक पंचायतीने केले आहे. ११ ऑक्टोबरपासून मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे येथे रिक्षा आणि टॅक्सीचे दर वाढवण्यात आले असून परिवहन विभागाने अधिकृत भाडेपत्रिकाही जारी केली आहे. या भाडेपत्रिकेनुसार रिक्षाचे भाडे प्रतिकिमी ९.८७ रुपये तर टॅक्सीचे भाडे प्रतिकिमी १२.३५ इतके आहे. परंतु चालक प्रवासाचे अंतर लक्षात न घेता मनमानीपणे प्रवाशांकडे मागणी करीत आहेत. याबाबतच्या अनेक तक्रारी ग्राहक पंचायतीकडे आल्या आहेत. रिक्षा-टॅक्सी चालक अशाप्रकारे जर फसवणूक करीत असतील तर प्रवाशांनी परिवहन विभागाच्या १८००२२०११० या टोलफ्री क्रमांकावर तक्रार करावी, असेही ग्राहक पंचायतीने स्पष्ट केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages