एसटीमध्ये महिलांसाठी राखीव आसने - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

एसटीमध्ये महिलांसाठी राखीव आसने

Share This
मुंबई : बेस्टच्या बसमध्ये ड्रायव्हरच्या मागच्या सहा सीट महिला प्रवाशांसाठी आरक्षित करण्यात आल्यानंतर आता एसटी प्रशासनानेही आपल्या बसेसमध्ये महिलांसाठी राखीव आसने ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. महामंडळाच्या साध्या, यशवंती (मिडी) आणि निमआराम बसमध्ये 150 किमीपर्यंतच्या अंतरासाठी महिलांना राखीव आसने देण्यात येणार आहेत. त्यामुळे महिलांना दिलासा मिळणार आहे.

कमी म्हणजेच 150 किमीपर्यंत अंतराच्या सेवांमध्ये पुढील सहा राखीव आसने महिला प्रवाशांसाठी फेरीच्या सुरुवातीपासून शेवटच्या ठिकाणापर्यंत कायमस्वरूपी राखीव ठेवण्यात आली आहेत. मार्गामध्ये चढणार्‍या महिला प्रवाशांच्या आग्रहानुसार त्यांना ही आसने उपलब्ध करून देण्याची जबाबदारी कंडक्टरची राहणार आहे. मात्र 150 किमी आणि त्यापेक्षा अधिक अंतराच्या निमआराम, मध्यम-लांब, लांब जलद आणि अतिजलद, रात्रराणी अशा आरक्षित सुविधा उपलब्ध असलेल्या बससेवांबाबत आरक्षण बंद होण्याच्या वेळेपर्यंत महिला प्रवाशांना मागणीनुसार या राखीव आसनांचे आरक्षण उपलब्ध होणार आहे. ज्याठिकाणी आसने राखीव आरक्षित होणार नाहीत, त्याठिकाणी बस सुटण्याच्या वेळेपूर्वी 5 मिनिटांपर्यंत ही आसने महिलांसाठी राखीव ठेवण्यात येतील, त्यानंतर मात्र ती इतर प्रवाशांना देण्यात येणार आहेत. त्यामुळे वाटेत चढणार्‍या महिलांना राखीव आसने मिळणार नाहीत. तसेच वातानुकूलित बसेसमध्ये महिलांसाठी राखीव आसने ठेवण्यात आलेली नाहीत.

अशी असणार राखीव आसने
50 आसनी साधी-निमआराम बस - आसन क्र. 21, 22, 23, 24, 25 आणि 26
यशवंती (मिडी बस) - आसन क्र. 11, 12, 13, 14, 15 आणि 
16राखीव आसने एसटीमध्ये महिलांना

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages