मुंबईत 11 ऑक्टोबरपासून रिक्षा- टॅक्सीची दरवाढ लागू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 October 2012

मुंबईत 11 ऑक्टोबरपासून रिक्षा- टॅक्सीची दरवाढ लागू


मुंबई: मुंबईत रिक्षा आणि टॅक्सीमधून फिरण्‍यासाठी आता प्रवाशांना जादा रूपये मोजावे लागणार आहे. मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाच्या (एमएमएआरटीए) शुक्रवारी झालेल्या बैठकीत रिक्षा आणि टॅक्सीच्या किमान दरवाढीला हिरवा कंदिल दाखविण्‍यात आला. या न‍िर्णयानुसार टॅक्सीच्या किमान भाड्यात दोन रुपयांची तर रिक्षाच्या भाड्यात तीन रुपयांची वाढ करण्यात आली. येत्या 11 ऑक्टोबरपासून ही दरवाढ लागू केली जाणार आहे.


नव्या दरानुसार प्रवाशांना टॅक्सीसाठी 19 रुपये तर, रिक्षासाठी 15 रुपये किमान भाडे द्यावे लागणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रिक्षा आणि टॅक्सी संघटनांनी भाडेवाढीची मागणी लावून धरली होती. या भाडेवाढीसाठी त्यांनी संपाचाही इशारा दिला होता. मात्र एमएमएआरटीएच्या बैठकीत अखेर रिक्षा आणि टॅक्सीच्या किमान भाड्यात वाढ करण्याचा  निर्णय घेण्यात आला. 

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS