शिवसेनेला ताकद दाखविण्यासाठी रामदास आठवलेंचा मेळावा - भारिपची टीका - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

शिवसेनेला ताकद दाखविण्यासाठी रामदास आठवलेंचा मेळावा - भारिपची टीका

Share This

मुंबई : रिपब्लिकन पक्षाच्या वर्धापनदिनाच्या माध्यमातून शिवसेना-भाजपाला आपली ताकद दाखविण्याचा केविलपणा प्रयत्न रामदास आठवले यांनी केला असल्याचे मत भारिप बहुजन महासंघाच्या प्रवक्त्या उज्ज्वला जाधव यांनी व्यक्त केले.

आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्या पदरात जास्तीजास्त जागा पडाव्यात, यासाठी आठवले यांनी हे शक्तीप्रदर्शन केले, असेही त्यांनी शुक्रवारी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना सांगितले. भारिप बहुजन महासंघाची नवी कार्यकारिणी जाहीर झाली असून पक्षाच्या अध्यक्षपदी अँड. प्रकाश आंबेडकर यांची फेरनिवड करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पक्षाचे अन्य पदाधिकारी पुढीलप्रमाणे - रणजित मेश्रम, अविनाश डोळस आणि प्रा. एस. के. जोगदंड (सल्लागार समिती), हरिभाऊभाडे(राजकीय समिती), ज. वि. पवार, भिकाजी डांगळे, मनोहर सोनावणे (कार्यालय समिती), उपाध्यक्ष पदी ज. वि. पवार, एल. डी. भोसले, मोहन साबळे, गायकवाड, मामा सावंत, गुणवंतराव पाटील, डॉ. सुरेश खोरे, शरद वसतकर, सुदास जाधव आणि डॉ. उज्ज्वला जाधव तर सरचिटणीसपदी बाबुराव पोटभरे, वसंत साळवे, नितीन भुजबळ, गौतम लांडगे, डॉ. संजय जाधव, सौधर्य चोकाजी, रमेश खंडागळे, अन्यवर इनामदार, भास्कर गोवंडे, डी. एन. खंदारे, दिलीप तायडे, मिलिंद पाखळे, भगवान शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages