बेस्ट एम्प्लॉईजच्या क्रेडिट सोसायटीची घोडदौड - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 October 2012

बेस्ट एम्प्लॉईजच्या क्रेडिट सोसायटीची घोडदौड

मुंबई : दी बेस्ट एम्प्लॉईजच्या को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड आजच्या घडीला 650 कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार करीत असून येत्या दोन वर्षात हा व्यवहार 800 कोटींवर जाईल, असा विश्वास बेस्ट वर्कर्स युनियनचे अध्यक्ष उदयकुमार आंबोणकर यांनी गुरुवारी एका पत्रकार परिषदेत व्यक्त केला. सप्टेंबर 2011 मध्ये दि बेस्ट एम्प्लॉईजच्या को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये शरद राव पॅनलचे 19 उमेदवार बहुमताने संचालक म्हणून निवडून आले. निवडून आलेल्या या संचालकांनी दी बेस्ट एम्प्लॉईजच्या को-ऑप. क्रेडिट सोसायटीचे कामकाज खूप चांगल्याप्रकारे हाताळले. सध्या या पतपेढीचे 40 हजारांहून अधिक सभासद आहेत. पतसंस्थेने दीर्घ कर्ज मुदत 4 लाख रुपयांवरून 7 लाख 50 हजारांपर्यंत उपलब्ध करून दिले. अतिरिक्त कर्ज 1 लाख रुपये सभासदांना देण्याची तरतूदही करण्यात आली. मासिक बचत ही 1 हजार रुपयांची करण्यात आली. महत्त्वाचे म्हणजे बेस्ट उपक्रमातील हंगामी कामगारांना 3 लाख 25 हजारांपर्यंत विविध कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय या संचालक मंडळाने नुकताच घेतला आहे. तसेच विद्युत पुरवठा विभागातील बाह्य स्वरूपाचे काम करणार्‍या सभासदांसाठी मोबाईल व्हॅन शाखा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती उदयकुमार आंबोणकर यांनी दिली.
     

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS