भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालयाचा विस्तार होणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 October 2012

भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालयाचा विस्तार होणार



मुंबई : भायखळा येथील वीरमाता जीजाबाई भोसले उद्यानात असलेल्या भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालयाच्या मागे असलेल्या मोकळय़ा जागेत या वस्तुसंग्रहालयाचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, सन 2015 पर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. या खुल्या असलेल्या 55 हजार चौ. मीटर जागेवर होणार असलेल्या वस्तुसंग्रहालयाच्या विस्तारासाठी पुढच्या वर्षी अर्थसंकल्पात तरतूद केली जाणार असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी सांगितले.

या वस्तुसंग्रहालयाच्या विस्तारासाठी गुरुवारी भाऊ दाजी लाड येथे झालेल्या बैठकीत महापौर सुनील प्रभू, राहुल शेवाळे, पालिका आयुक्त सीताराम कुंटे तसेच सध्या वस्तुसंग्रहालयाच्या देखभालीची जबाबदारी असलेल्या बजाज फाऊंडेशनचे पदाधिकारी तस्लीम मेहता आदी उपस्थित होते. आतापर्यंत या वस्तुसंग्रहालयाला 44 हजार प्रेक्षकांनी भेट दिली असून, त्यामध्ये 11 हजार पर्यंटक होते, असे शेवाळे यांनी सांगितले.

भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालयाच्या विस्तारात शैक्षणिक कार्यक्रमांसाठी व खुल्या व्याख्यानासाठी कार्यशाळा, प्रदर्शनाच्या आयोजनासाठी विशेष प्रकल्प स्थळ 1 आणि 2 ची निर्मिती, उपहारगृह आणि वस्तुसंग्रहालय विक्री केंद्र उभारण्यात येणार आहे. 

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS