26 नोव्हेंबर संविधान दिवस साजरा करा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 November 2012

26 नोव्हेंबर संविधान दिवस साजरा करा


मुंबई- भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद व पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना भारतीय संविधान सुपूर्द केले होते. 
त्यानंतर 26 जानेवारी 1950 पासून भारतीय संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली. त्यामुळे 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करावा, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले आहे.
संविधान दिवसानिमित्त 26 नोव्हेंबरला मुलुंडमधील एमआयएम रुग्णालय ते भय्यासाहेब आंबेडकर चौक येथे रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली संविधान गौरव रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. आंबेडकर चौकात रॅलीचा समारोप होईल व तिथेच सभा होईल, असे आठवलेंनी कळवले आहे

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS