नगरसेवक मोरे यांच्या निषेधार्थ मोर्चा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 November 2012

नगरसेवक मोरे यांच्या निषेधार्थ मोर्चा



मुंबई- दादरमधील इंदू मिलच्या जागेवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्याची मागणी करणारे नायगाव येथील कॉंग्रेसचे नगरसेवक सुनील मोरे यांच्या निषेधार्थ आज स्थानिकांनी मोर्चा काढला. 

इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याची दलित समुदायाची मागणी पूर्ण करण्याचे आश्‍वासन खुद्द पंतप्रधानांनी दिले आहे. मात्र, कॉंग्रेस नगरसेवकानेच त्या जागेवर ठाकरे यांचे स्मारक उभारण्याची मागणी केल्याबद्दल दलित समुदायात संतापाची भावना आहे. नायगावसारख्या दलितबहुल विभागातून निवडून आलेल्या मोरे यांनी अशी मागणी केल्यामुळे नाराज झालेल्या नागरिकांनी आज मोर्चा काढून त्यांचा निषेध केला. देवरुखकर चौकात सुरू झालेला हा मोर्चा अंकुर बुद्धविहार येथे समाप्त झाला. दलित समाजाच्या भावना दुखावल्यामुळे मोरे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवावा, अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी भोईवाडा पोलिसांकडे केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS