भिमसेनेच्या पांडियन यांना खोट्या गुन्हयामध्ये अडकवल्याचा आरोप - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 November 2012

भिमसेनेच्या पांडियन यांना खोट्या गुन्हयामध्ये अडकवल्याचा आरोप

मुंबई / अजेयकुमार जाधव 
राष्ट्रीय भीमसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अड्वोकेट आर. आर पांडियन यांच्या विरोधात खोट्या तक्रारी करून खोट्या गुन्हयामध्ये अडकवून एका दलित समाजातील नेत्याला संपवण्याचे षडयंत्र पोलिसांकडून रचले जात असल्याचा आरोप भिमसेनेच्या वाहुतुक सेनेच्या सचिन गवारे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.

चेंबूर येथिल बंगला क्रमांक ८७ / अ हा पांडियन यांनी विकत घेतला होता. ठरलेल्या व्यवहार प्रमाणे एकूण रकमेच्या अर्ध्याहुन अधिक रक्कम सदर बंगल्याच्या मालकाला देण्यात आली होती. या बाबत काही वाद असल्याने याबाबतचे प्रकरण उच्च न्यालालयात प्रलंबित असतानाही काही दलालांच्या सांगण्यावरून असा व्यवहार झाली नसल्याची खोटी तक्रार चेंबूर पोलीस ठाण्यामध्ये करण्यात करून पांडियन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच चेंबूर येथील श्रमजीवी नगर येथे कोजागिरी पौर्णिमेच्या कार्यक्रमा वेळी पत्नीच्या प्रसूतीची माहिती मिळाल्याने उपस्थितांची रजा घेवून पांडियन हे पवई हिरानंदिनी रुग्णालयात गेल्या नन्तर काही समाज कंटकांनी शासकीय कर्मचारयांवर हल्ला केला होता. पवई येथील हिरानंदिनी रुग्णालयात पांडियन हे उपस्थित असल्याचे सीसीटीव्ही क्यामेरामध्ये नोंद झाले असतानाही त्यांच्या विरोधात नेहरू नगर पोलीस ठाण्यामध्ये ३०७ चा गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली आहे.

हा एका दलित नेत्याला संपवण्याचा प्रयत्न असून पोलिसांकडून षड्यंत्र रचून दलितांचा आवाज बंद करण्यासाठी पांडियन यांना खोटे गुन्हे नोंदवून अटक केल्याचा आरोप वाहतूक सेनेच्या सचिन गवारे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS