शांतता आणि संयम राखा शिवसेनेचे कार्यकर्त्यांना आवाहन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 November 2012

शांतता आणि संयम राखा शिवसेनेचे कार्यकर्त्यांना आवाहन

मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी उद्या (ता. 18) शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वांनी शांतता राखावी, संयम आणि शिस्त पाळावी. सार्वजनिक वाहतूक सुरू ठेवावी आणि तिचा वापर करावा, असे आवाहन शिवसेनेने केले आहे. 

शिवसेनाप्रमुखांच्या निधनामुळे महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. बाळासाहेबांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी आणि अंत्यसंस्कारांसाठी राज्यातून; तसेच परराज्यांतून हजारो शिवसैनिक मुंबईत दाखल होणार आहेत. या काळात शिवसैनिकांनी शांतता आणि संयम पाळण्याचे आवाहन पक्षनेते खासदार संजय राऊत आणि खासदार अनिल देसाई यांनी केले आहे. बेस्ट बससेवा, एसटी, रेल्वे आणि विमान वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी प्रयत्न करावेत. या सेवांत कोणतेही अडथळे आणू नयेत. वर्तमानपत्रे, रुग्णसेवा, मेडिकल स्टोअर, दूध वाहतुकीत अडथळे आणू नयेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS