मुंबईत कडकोट बंदोबस्त - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 November 2012

मुंबईत कडकोट बंदोबस्त

मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्यदर्शनासाठी लाखो शिवसैनिक उद्या (ता. 18) शिवाजी पार्क येथे येतील. या काळात शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस दल सज्ज असून अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. तब्बल 20 हजार पोलिसांसह शीघ्र कृती दल (आरएएफ), राज्य राखीव पोलिसांची पथके ठिकठिकाणी तैनात करण्यात येणार आहेत. गैरकृत्य करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश पोलिस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंह यांनी दिले आहेत. 

मुंबई शहरात 20 हजार पोलिस, राज्य राखीव पोलिस दलाच्या 15 कंपन्या, शीघ्र कृती दलाच्या तीन कंपन्या बंदोबस्त ठेवतील. बॉम्बशोधक पथक (बीडीडीएस) तैनात ठेवले जाईल. शिवाजी पार्क येथे सकाळी 7 ते दुपारी 3.30 या काळात शिवसेनाप्रमुखांचे अंत्यदर्शन घेता येईल. अंत्यदर्शन आणि अंत्यसंस्कारांसाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. 

शांतता राखा, अफवांवर विश्‍वास ठेवू नका. 
नागरिकांनी शहरात शांतता ठेवावी. अफवांवर विश्‍वास ठेवू नये. कोणीही अनुचित प्रकार करताना आढळल्यास पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलिस आयुक्तांनी केले आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS