"तरुणींना अटक करण्यात पोलिसांनी घाई का केली?' - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 November 2012

"तरुणींना अटक करण्यात पोलिसांनी घाई का केली?'


ठाकरे यांच्या निधनानंतर फेसबुकवर नकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्या

मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर फेसबुकवर नकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्या पालघर येथील दोघा तरुणींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक झाल्याच्या घटनेची पोलिस महासंचालक कार्यालयाने गंभीर दखल घेतली आहे. या तरुणींना अटक करण्यात पोलिसांनी घाई का केली, याची कोकण विभागीय पोलिस महानिरीक्षकांमार्फत चौकशी होणार आहे. 


शिवसेनाप्रमुखांच्या निधनानंतर पालघर येथे राहणाऱ्या एका तरुणीने तिच्या फेसबुकच्या वॉलवर "अशा घटना नेहमीच होतात, त्यासाठी शहर बंद ठेवण्याची आवश्‍यकता नव्हती' अशा आशयाची कमेंट पोस्ट केली होती. या कमेंटला तिच्या एका मैत्रिणीने लाईक केले होते. हे परिसरातील शिवसैनिकांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी त्या मुलीच्या काकांच्या रुग्णालयात तोडफोड केली. त्यानंतर पालघर पोलिसांनी त्या मुलींविरोधात धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल करून तिला व तिच्या मैत्रिणीला अटक केली. 

या घटनेची राज्याच्या पोलिस महासंचालक कार्यालयाने दखल घेतली आहे. असा गुन्हा दाखल होऊ शकतो का, याची चौकशी करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. याशिवाय या दोन्ही तरुणींना अटक करण्यात पोलिसांनी एवढी घाई का केली, हेसुद्धा तपासले जाणार आहे. कोकण विभागीय पोलिस महानिरीक्षक सुखविंदर सिंह यांच्या नेतृत्वाखाली ही चौकशी होणार आहे, अशी माहिती कायदा व सुव्यवस्था विभागाचे महानिरीक्षक देवेन भारती यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS