आंतरराष्ट्रीय पुरुष दिनानिमित्त संघटनांची मागणी
मुंबई : पुरुषप्रधान म्हणवणार्या भारतीय संस्कृतीत पुरुषांच्या बाजूने कुठलाही कायदा दिसत नाही. याउलट अनेक कायदे महिलांच्या बाजूने आहेत. हुंडाबळी विरोधी कायदा, घरगुती हिंसाचार कायदा यांसारख्या कायद्यांचा काही प्रमाणात दुरुपयोग होत असल्याचे दिसून येते. महिलांवर कोणताही अत्याचार झाल्यास पुरुषाला आरोपीच्या पिंजर्यात उभे केले जाते, मात्र पुरुषांच्या बाजूने कायदे नसल्याने तो निदरेष ही असून त्याच्यावर आरोपीचा शिक्का बसतो. या पाश्र्वभूमीवर पुरुषांच्या बाजूने कायदे असले पाहिजेत, अशी मागणी काही संघटनांनी केली आहे. जागतिक पुरुष दिनानिमित सीएसटी येथे इंडियन फॅमिली फाऊंडेशन (आयएफएफ), प्रोटेक्ट इंडियन फॅमिली फाऊंडेशन (पीआयएफएफ) आणि मशाल यांच्या संयुक्त विद्यमाने पुरुष कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
Post Top Ad
20 November 2012
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment