बाळासाहेबांच्या अंत्यसंस्काराला शासकीय दर्जा कोणत्या निकषातून दिला - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 November 2012

बाळासाहेबांच्या अंत्यसंस्काराला शासकीय दर्जा कोणत्या निकषातून दिला


माहिती अधिकारात मुख्यमंत्र्यांनकडून मागवली माहिती 
मुंबई/ अजेयकुमार जाधव 
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावरून वाद निर्माण झाला असतानाच ठाकरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय कोणत्या निकषाखाली घेण्यात आला, बाळासाहेबाना हा दर्जा कोणत्या निकषाखाली देण्यात आला यासाठी काय प्रक्रिया केली याची सविस्तर माहिती माहिती अधिकारात मुख्यमंत्री कार्यालयाकडून मागवण्यात आली आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे १७ नोव्हेंबरला निधन झाल्यानंतर १८ नोव्हेंबरला त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. बाळासाहेबांचे पार्थिव तिरंग्यात खाकून बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना सलामी देण्यात आली होती. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी १८ नोव्हेंबरला सकाळीच बैठक बोलावून बाळासाहेबांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतेला होता.

या निर्णयाबाबत उत्तर प्रदेशच्या अलिगढ येथील जमील मोहम्मद यांनी माहिती अधिकारात मार्फत बाळासाहेबाना हा सन्मान कोणत्या निकषात दिला, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याची नियमावली काय, मुख्यमंत्री चव्हाण यांनी याबाबत कधी बैठक बोलावली, या बैठकीला कोण कोणते अधिकारी व मान्यवर उपस्थित होते, या बैठकीचे इतिवृत्त द्यावे अशी मागणी मुख्यमंत्री कार्यालयाकडे केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS