सदस्य नसलेला विधान परिषदेचा नेता कसा ? - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

सदस्य नसलेला विधान परिषदेचा नेता कसा ?

Share This
जयंत पाटील यांचा सत्ताधार्‍यांना सवाल?नागपूर : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची विधान परिषदेच्या सभागृहाच्या नेतेपदी निवड करण्यावर शेकापचे जयंत पाटील यांनी जोरदार आक्षेप घेत जो सभागृहाचा सदस्य असतो तोच सभागृहाचा नेता होऊ शकतो. यासाठी घटनेचा आधार देत काही काळ उपमुख्यमंत्रीपदाचा परिचय रोखून धरला.

सभागृह सुरू झाल्यानंतर संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा परिचय करून देण्यास उभे होताच विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी यावर आक्षेप घेतला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण रविवारीच म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार बिनाखात्याचे मंत्री आहेत. संसदीय परंपरेला धरून त्यांचा परिचय करून देणे योग्य होणार नाही. विनोद तावडे यांच्या आक्षेपाला पाठिंबा देताना जयंत पाटील यांनी सभागृह दणाणून सोडले. सभागृहात नेता जाहीर होण्यापूर्वी मी हरकत घेतो. सभागृहाचा सदस्य असतो तोच सदनाचा नेता होऊ शकतो. अजितदादा पवार विधानपरिषदेचे सदस्य नाहीत, विधानसभेचे सदस्य आहेत. सभागृहाचा सदस्य नसलेल्यांना नेता ठरविण्याची घटनेत तरतूद नाही. कौल शकधर यांचा आधार घेत व संसदेच्या नियमाचे दाखले देत त्यांना सभागृहाचे नेतेदेखील निवडता येणार नाही, असा पाटील यांनी आक्षेप घेतला. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग लोकसभेचे सदस्य नसल्याने सुशीलकुमार शिंदे सभागृहाचे नेते आहेत. अजित पवार यांना आपला व्यक्तिगत विरोध नाही. उपमुख्यमंत्रीपद घटनात्मक पद नाही, असा उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. उपमुख्यमंत्रिपदाचा जो शपथविधी झाला त्याचे आम्हाला निमंत्रणसुद्धा नाही. अजित पवार यांची सभागृह नेते म्हणून असलेली नियुक्ती घटना व कार्यपद्धतीविरोधी आहे. यामुळे आज सभागृह नेत्याच्या नावाची घोषणा रद्द करण्यात यावी, अशी कडाडून मागणी केली. यानंतर जयंत पाटील यांनी सदर प्रतिनिधीसोबत बोलताना सांगितले की, अधिवेशनानंतर आपण या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages