फाईव्ह गार्डनची दुरावस्ता - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

फाईव्ह गार्डनची दुरावस्ता

Share This
मुंबई / प्रतिनिधी 
माटुंगा पूर्व येथे फाईव्ह गार्डन उद्यान असून या उद्यानाची दुरावस्ता झाली असल्याने येथे खेळण्यासाठी येणाऱ्या मुलांच्या जीवितास धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या उद्यानामधील घसरगुंडी, झोपाळे, सी सॉ यासारख्या खेळासाठीच्या वस्तूंची मोडतोड झाली आहे. घसरगुंडीचे पत्रे तुटले असल्याने मुलांना हे पत्रे लागून दुखापत होऊ शकते. या मुळे या उद्यानाची करण्यात यावी अशी मागणी मनसेचे वडाळा विभाग प्रमुख आनंद प्रभू यांनी केली. दरम्यान याबाबत महापौर सुनील प्रभू यांनी या उद्यानाच्या दुरुस्तीसाठी २०१३ च्या अर्थसंकल्पात तरतूद करून हे उद्यान दुरुस्त केले जाईल  असे सांगितले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages