मुंबई / रशीद इनामदार (NEWS website:- http://jpnnews.webs. com)
मध्य रेल्वेच्या मेन मार्गावर १५ डब्यांच्या लोकल गाड्या आजपासून सुरु झाल्या . त्या लोकल गाड्यांनी दुसऱ्या वर्गातील पुरुष प्रवाशांची मात्र निराशा केली.
आधी १२ डब्याच्या रेल्वे गाड्या धावत होत्या त्यात गर्दीने त्रस्त झालेले प्रवासी १५ डब्याच्या गाडीकडे खूप उत्सुकतेने पाहत होते . १५ डब्याच्या गाड्या सुरु झाल्या त्यात वाढवलेले ३ डब्यांपैकी २ डबे हे प्रथम वर्गासाठी आणि १ डबा महिलांसाठीचा आहे .
आनंदाची बाब हि आहे कि अपंगांसाठी असलेले डबे आता मोठे करण्यात आले आहेत.त्यामुळे अपंगाना होणारा त्रास हि आता कमी झाला आहे. या सर्वात मात्र २र्या वर्गातून प्रवास करणाऱ्या पुरुष प्रवाशांना मात्र दिलासा मिळाला नाही. त्यामुळे त्या प्रवाशात नाराजीचा सूर दिसून येत आहे .
त्यात हि १५ डब्याची सेवा कल्याण पर्यंतच असल्यामुळे त्यापुढील प्रवाशांना या झालेल्या बदलांचा काहीही फायदा झालेला नसल्यामुळे प्रवासी मध्य रेल्वेच्या या निर्णयाचे स्वागत करण्यापेक्षा नाराज असल्याचे दिसत आहेत .


No comments:
Post a Comment