भारताचे सैन्य हे देशाची एकता आणि धर्मनिरपेक्षतेचे एक उत्तम उदाहरण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 December 2012

भारताचे सैन्य हे देशाची एकता आणि धर्मनिरपेक्षतेचे एक उत्तम उदाहरण

मुंबई : भारताचे सैन्य हे देशाची एकता आणि धर्मनिरपेक्षतेचे एक उत्तम उदाहरण असून सैन्याने भारतीय जनतेमध्ये ऐक्याची भावना प्रोत्साहित केली आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल के. शंकरनारायणन् यांनी केले.

1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धामध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानवर विजय मिळवला होता. या विजयाच्या स्मृतीनिमित्त शिवाजी पार्कमध्ये आयोजित 'विजय दिन' समारंभात बोलताना राज्यपाल पुढे म्हणाले की, या ठिकाणी विजय दिनानिमित्त सैन्यातील जवानांच्या वतीने करण्यात आलेले प्रदर्शन हे तरुणांना सैन्यामध्ये सामील होण्यासाठी प्रोत्साहित करणारे आहे. जगातील दुसर्‍या सर्वात मोठय़ा सैन्यामध्ये सामील होण्यासाठी तरुणांना प्रेरित आणि प्रोत्साहित करण्याची ही चांगली संधी आहे. या ठिकाणच्या शस्त्र प्रणाली आणि उपकरणांच्या प्रदर्शनाने सैन्याच्या भूमिकेमध्ये जागरुकता येण्यास मदत होईल. भारताच्या सशस्त्र दलांनी देशाची सुरक्षा आणि अखंडतेच्या संरक्षणाबरोबर नेहमीच नैसर्गिक आणि मानवी आपत्तीच्या वेळीही मदत आणि बचावकार्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ते पुढे म्हणाले की, सरकार आणि प्रशासन माजी सैनिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. हे प्रयत्न यापुढेही चालू राहण्याला सरकार प्राधान्य देईल. शिवाजी पार्कवर आयोजित 'अपनी सेना को जानिए मेला' पाहण्यासाठी लोकांनी तसेच माजी सैनिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थिती दाखवल्याबद्दल आनंद व्यक्त केला

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS