स्तन कॅन्सर यंत्रणेबाबत पालिका अतिरिक्त आयुक्त उदासीन - गीता गवळी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 December 2012

स्तन कॅन्सर यंत्रणेबाबत पालिका अतिरिक्त आयुक्त उदासीन - गीता गवळी

मुंबई : पालिकेत नुकत्याच झालेल्या कॅन्सर चाचणी शिबिरात एका महिला कर्मचार्‍यास स्तन कॅन्सर झाल्याचे आढळून आले,तर आणखी 8 महिलांमध्ये स्तन कॅन्सरसदृश गाठी असल्याचे आढळून आले. या शिबिरासाठी आरोग्य समितीच्या अध्यक्षा गीता गवळी यांनी 'नो टच ब्रेस्ट स्कॅन' ही यंत्रणा पुणे येथून आणून शिबिरासाठी उपलब्ध करून दिली होती. पालिकेच्या रुग्णालयात ही यंत्रणा उपलब्ध करून दिल्यास जनसामान्यांना लाभ होणार आहे. त्यामुळे या मुद्दय़ावर अतिरिक्त आयुक्त (आरोग्य) मनीषा म्हैसकर यांना पत्र लिहिल्याचे गवळी यांनी सांगितले आहे. मात्र ही यंत्रणा खरेदी करण्यासाठी म्हैसकर टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे महिलांच्या स्तन कॅन्सरबाबत त्या उदासीन असल्याचे दिसून येत आहे.

गीता गवळी यांनी 3 आणि 4 डिसेंबर रोजी पालिका मुख्यालयात महिला कर्मचार्‍यांसाठी स्तन कॅन्सर चाचणी शिबिराचे आयोजन केले होते.या शिबिरात स्तन कॅन्सर मशीनने महिलांची वैद्यकीय चाचणी घेण्यात आली. प्राथमिक स्तरावर साडेतीनशे महिला कर्मचार्‍यांनी आपल्या नावाची नोंद केली होती,मात्र अवघ्या 125 महिला कर्मचार्‍यांनी शिबिरात उपस्थिती लावली. अंतिम तपासणी अहवाल उपलब्ध झाल्यानंतर संशयित 8 महिलांना स्तनाचा कॅन्सर झाल्याचे निष्पन्न होणार आहे. या महिलांना पालिकेतर्फे औषधोपचार आणि वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. मुंबईतील महिलांमध्ये स्तनाच्या कॅन्सरचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी आणि कर्करोगाच्या तपासणीसाठी पालिकेने वेदनारहित स्पर्श, क्ष-किरण विरहित असे नो
टच ब्रेस्ट स्कॅन यंत्रणा त्वरित खरेदी करावी, अशी मागणी गवळी यांनी महापौर सुनील प्रभू यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. याशिवाय सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत या मागणी पत्रावर विचार करण्यात यावा, असे गवळी यांनी पत्रात म्हटले आहे. त्यामुळे बुधवारी होणार्‍या सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत या मागणीवर निर्णय घेण्यात येणार आहे

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS