जगात भारत पहिल्या क्रमांकावर यावा- अमिताभ बच्चन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 January 2013

जगात भारत पहिल्या क्रमांकावर यावा- अमिताभ बच्चन

पालिका विद्यार्थ्यांचा व्हच्र्युअल क्लासच्या माध्यमातून बच्चन यांच्याशी थेट संवाद
मुंबई : ज्या देशात शिक्षणाचा प्रसार मोठय़ा प्रमाणात होतो तो देशच प्रगतिशील देश होतो. जगात आपली गणना तिसर्‍या देशात केली जाते. भारत पहिल्या क्रमांकावर यावा, अशी भावना महानायक अमिताभ बच्चन यांनी व्हच्यरुअल क्लासरूमच्या दुसर्‍या टप्प्यात उद्घाटनप्रसंगी व्यक्त केली. 

ज्ञानामुळेच आपल्याला हक्काची जाणीव होते. महिला या देशाच्या 50 टक्के शक्ती आहेत. संधी मिळत नाही तोपर्यंत ज्ञानात वाढ होत नाही. आमचा आवाज समाज ऐकतो यासाठी चांगल्या गोष्टी आमच्या मार्फत सांगू. कुठलेही कॅम्पेन पुढे न्यायचे असेल तर मी येईन, असे आश्वासन या वेळी अमिताभ बच्चन यांनी दिले. पालिकेतील विद्यार्थी भाग्यशाली आहेत. व्हच्यरुअल क्लासच्या माध्यमातून त्यांना शिक्षणाची संधी मिळून त्यांच्या ज्ञानात भर पडेल, असेही अमिताभ यांनी या वेळी सांगितले.

पालिकेच्या 400 शाळांमधून व्हच्र्युअल क्लासरूचे उद्घाटन होत आहे. पालिका शाळांमध्ये नंबर वनच्या सुविधा असल्या पाहिजेत. माझ्या मुंबईतील मुलांना योग्य शिक्षणाची सोय हवी. तंत्रज्ञान सतत पुढे जात आहे त्याचा उपयोग सर्वसामन्यांना झाला पाहिजे. पालिका केवळ मुंबई, महाराष्ट्रापुरती मर्यादित नसावी. एवढय़ापुरते थांबू नका. मुंबई महानगरपालिका मोठे विद्यापीठ झाले पाहिजे. परदेशी विद्वानांनी पालिकेतील मुलांना शिकवले पाहिजे. प्रत्येक नागरिकांना आपला मुलगा पालिका शाळेत शिकत आहे हे सांगण्याचा अभिमान वाटला पाहिजे, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याप्रसंगी केले.जगात कुठेही गेलात तरी मुंबईला, महाराष्ट्राला, मराठीला विसरू नका असे? आवाहन उद्धव ठाकरे यांनी या वेळी केले. या वेळी पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, पालिका शाळांतील मुलांना अतिशय दर्जेदार शिक्षण मिळावे याची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad