जिल्हा नियोजन समितीवर नगरसेवकांची निवड बिनविरोध - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 January 2013

जिल्हा नियोजन समितीवर नगरसेवकांची निवड बिनविरोध


मुंबई : मुंबई शहर जिल्हा आणि मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीसाठी मुंबई महानगरपालिकेतून एकूण 80 नगरसेवकांची वर्णी लागणार असून यामध्ये 40 नगरसेवकांची नियुक्ती मुंबई शहर भागातून तर 40 नगरसेवक मुंबई उपनगरातून दिले जाणार आहेत. ही नियुक्ती निवडणुकीद्वारे केली जाते, मात्र पालिकेतील सर्वपक्षीय गटनेत्यांनी सकारात्मक चर्चेतून सर्व सदस्यांची नेमणूक बिनविरोध करण्याचे ठरवल्याने केवळ निवडणूक कार्यक्रम पूर्ण करण्याची जबाबदारी उरली आहे.

जिल्हा नियोजन समितीवर नगरसेवकांची नियुक्ती करताना त्या-त्या पक्षाच्या संख्येनुसार सदस्यांना संधी असते; परंतु निवडणुकीद्वारे या सदस्यांची नेमणूक झाल्यास सपा व राष्ट्रवादीसारख्या छोटय़ा संख्येने पक्षांना याचा सर्वाधिक फटका बसला असता. मात्र विरोधी पक्ष नेते ज्ञानराज निकम आणि सभागृह नेते यशोधर यांच्या पुढाकाराने सर्वपक्षीय गटनेत्यांनी ही निवडणूक घेऊन प्रत्येक पक्षाला जागा ठरवून दिल्या. त्यानुसार, मुंबई शहर भागात सत्ताधारी सेना-भाजपाला एकूण 26 जागा प्राप्त झाल्या तर विरोधी पक्षांना 14 जागा मिळाल्या आहेत. याचप्रमाणे उपनगर भागातही सत्ताधारी 26 आणि विरोधक 14 अशा जागांचे वाटप करण्यात आले आहे. दरम्यान, जिल्हा नियोजन समितीवर सदस्यांची नेमणूक करताना सर्वसाधारण गट, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरीकांचा मागासवर्ग यानुसार नगरसेवकांना संधी दिली जाणार आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS