संपूर्ण देशभरातील औद्योगिक कर्मचारी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी 20 फेब्रुवारीपासून दोनदिवसीय संपावर जाणार आहेत. विविध औद्योगिक समूहांतील कर्मचारी या संपात सामील होतील, अशी माहिती 'स्टील मेटल अँण्ड इंजिनीअरिंग वर्कर्स फेडरेशन ऑफ इंडिया'चे सरचिटणीस संजय वाधवकर यांनी बुधवारी दिली. कर्मचार्यांना दर महिन्याला 10 हजार रुपये इतके किमान वेतन देण्यात यावे, ही आपली प्रमुख मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. मागण्यांच्या पूर्ततेसाठी दोनदिवसीय संपाबरोबरच ठाण्यात 23 व 24 फेब्रुवारी रोजी व्यापारी संघटनेच्या प्रतिनिधींची राष्ट्रीय बैठकही बोलावण्यात आली आहे. या बैठकीत कर्मचार्यांच्या मागण्यांविषयीच चर्चा होणार असल्याचे वाधवकर यांनी स्पष्ट केले.
Post Top Ad
10 January 2013
Home
Unlabelled
औद्योगिक कर्मचार्यांचा दोनदिवसीय संप
औद्योगिक कर्मचार्यांचा दोनदिवसीय संप
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment