मुंबई : देशातील 50 कोटी असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा, महागाई, पेन्शन, अन्न, वस्त्र, निवारा द्या, या मागण्या घेऊन केंद्रीय नऊ कामगार संघटना व इतर शेकडो संघटनांच्या वतीने शिवसेनेच्या सहभागाने होत असलेला 20-21 फेब्रुवारी संप यशस्वी करण्यासाठी मुंबईत 18 पेब्रुवारी लाँग मार्च काढण्यात येणार आहे. त्या वेळी दोन लाख कामगार सहभागी होणार असल्याची माहिती कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने पत्रकार संघ येथे गुरुवारी देण्यात आली.
या वेळी कामगार नेते सूर्यकांत महाडिक, ए. डी. गोलंदाज, अण्णा देसाई, आर. पी. भटनागर, सूर्यकांत बागल, के. एल. बजाज, उदय भट, विश्वास उटगी आदी पदाधिकारी उपस्थित होते. जीवनावश्यक वस्तू, रोजगार, कामगार, गुंतवणूक, फेरीवाले, उद्योग, वेतन आयोग, व्यापारी आदी महत्त्वाचे 20 घटक आज उपेक्षित आहेत. त्यांच्या मागण्यांसाठी हा संप होत आहे. 18 फेब्रुवारीला होणार्या लाँग मार्चची राणी बागेमधून सुरुवात होणार आहे. आझाद मैदानात या मार्चचे रूपांतर एका भव्य सभेत होणार असल्याचे कॉम्रेड ए. डी. गोलंदाज यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment