मुंबईच्या पाणीपुरवठय़ासाठी पालिकेने जलबोगदे करून मुंबईकरांना पाण्याची व्यवस्था करण्याचे काम सुरू आहे. जोगेश्वरी ते सांताक्रुझ पर्यंतचा पाणीपुरवठा सुरळीत व्हावा म्हणून पवई ते वेरावली (जोगेश्वरी) असा जलबोगदा करण्याचे काम सुरू आहे. मात्र या मार्गात प्राचीन कोंडीवटे बुद्ध लेणी (महाकाली गुंफा) येत आहे. त्यामुळे भारतीय पुरातत्व विभागाने पालिकेला नोटीस बजावली आहे.
पुरातत्व विभागाने या खोदकामाबाबत आता पालिकेला नोटिसीद्वारे काम थांबवून सविस्तर अहवाल मागितला आहे. परवानगी घेतली होती का असा प्रश्न या पालिकेला नोटिसीद्वारे विचारला आहे. १७ जानेवारीला पालिकेला ही नोटीस आली आहे. अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी बुधवारी दिली. पुरातन वास्तूच्या २०० मीटर आसपास प्रतिबंधित विभाग घोषित केलेला असतो. या नियमाचे उल्लंघन करणार्यास एक लाख रुपये दंड किंवा दोन वर्षाची शिक्षा अथवा दोन्ही शिक्षा अशी तरतूद आहे. त्यामुळे पालिकेचे अधिकारी या सर्व प्रकरणाकडे गांभीर्याने पाहू लागले असून नियम धाब्यावर बसवून खोदकाम केल्याने शिक्षा होण्याची भीती असल्याने पालिका अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
No comments:
Post a Comment