जीवन अमृत सेवा योजना संपूर्ण राज्यात सुरू करणार - सुरेश शेट्टी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

जीवन अमृत सेवा योजना संपूर्ण राज्यात सुरू करणार - सुरेश शेट्टी

Share This

मुंबई : सातारा येथे प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेली जीवन अमृत सेवा (ब्लड ऑन कॉल) योजना संपूर्ण राज्यात येत्या सहा महिन्यांत सुरू करण्यासाठी आरोग्य विभागातर्फे प्रय▪करण्यात येत आहेत. या योजनेमुळे मागेल त्याला वेळेवर योग्य गटाचे रक्त मिळणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी शुक्रवारी येथे दिली.

राज्य रक्त संक्रमण परिषदेची आढावा बैठक मंत्रालयात झाली. त्या वेळी आरोग्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, राज्यात सातारा आणि सिंधुदुर्ग येथे जीवन अमृत सेवा ही योजना प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते सातारा येथे या योजनेचे उद््घाटन करण्यात आले. आता पुढील आठवड्यात सिंधुदूर्ग येथे ही योजना कार्यान्वित होईल. मागेल त्याला आणि वेळेवर रक्त पुरवठा करणारी ही महत्त्वाकांक्षी योजना असल्याचेही सुरेश शेट्टी यांनी सांगितले.

येत्या सहा महिन्यांमध्ये संपूर्ण राज्यात ही योजना सुरू करण्याचे विचाराधीन असून त्यादृष्टीने नियोजन सुरू आहे. त्यासाठी निधीचीदेखील तरतूद करण्यात आली आहे. राज्यात १३४ स्टोरेज युनिट असून त्यांच्या माध्यमातून रक्तपेढय़ांचे जाळे मजबूत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना वेळेवर रक्त मिळणे शक्य होणार आहे. १0२ क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर तांत्रिक तपासणी करून रक्तगट जुळवणी झाल्यानंतर मोटारसायकलने शीतपेटीमधून रक्तपुरवठा केला जाईल, असे सांगून सुरेश शेट्टी म्हणाले की, राज्यातील प्रत्येक खाजगी रुग्णालयात जीवन अमृत सेवा योजनेची माहिती आणि दूरध्वनी क्रमांकाविषयीचा फलक लावणे सक्तीचे करण्यात येणार आहे. सातारा आणि सिंधुदूर्ग येथील योजनेच्या अंमलबजावणीबाबत अभ्यास करून संपूर्ण राज्यात ही योजना सहा महिन्यांत सुरू करण्यातबाबत विभागातर्फे प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages