मुंबई : गेल्या काही काळात राज्यातील दलितांवर वाढणारे अत्याचार आणि सरकारकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात येणारे अपयश, महागाई, भ्रष्टाचार, मागासवर्गीयांची भरती यासहित विविध मुद्दे आणि प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली संसदेवर १३ मार्च रोजी धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.
या मोर्चात रिपाइंच्या कार्यकर्त्यांसमवेत सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद, रेल्वे,बँका, आयुर्विमा, मनपा आणि विविध आस्थापनांचे कर्मचारी सहभागी होणार आहेत.रिपाइंच्या मागण्या मान्य न झाल्यास येणार्या निवडणुकीत सरकारचे तीनतेरा वाजवण्याचा संकल्प रिपाइंने केला आहे.
No comments:
Post a Comment