लोकसभा निवडणूक लढविणार नाही - शिंदे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

लोकसभा निवडणूक लढविणार नाही - शिंदे

Share This
कॉँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी आपल्याला राजकारणात भरपूर काही दिले आहे. शिवाय, सोलापूरकर आणि हुतात्म्यांच्या पुण्याईने पक्षाकडून जी जबाबदारी देण्यात आली, ती आपण त्या-त्या वेळी निष्ठेने पार पाडली आहे. त्यामुळे लोकांनी जा म्हणेपर्यंत आपण राहू नये या मताचा मी आहे. त्यामुळे आगामी २0१४ सालची लोकसभेची निवडणूक आपण लढविणार नाही, असा पुनरुच्चार केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला.

सोलापूर श्रमिक पत्रकार संघात रविवारी आयोजित करण्यात आलेल्या वार्तालाप कार्यक्रमाप्रसंगी ना. शिंदे बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, सोलापूरने देशाला एक कार्यकर्ता दिला. सोलापूरकरांच्या प्रेमामुळेच आपणास केंद्रातील मोठमोठी मंत्रीपदे मिळाली. इतकेच नव्हे, तर आतापर्यंत महाराष्ट्रातील कोणालाच जे पद मिळाले नाही ते लोकसभेचे नेतेपद मला मिळाले. ही सोलापूरच्या दृष्टीने भाग्याची गोष्ट आहे. त्यामुळे कॉँग्रेसने इतकी मोठी देशपातळीवर काम करण्याची संधी दिली असताना आता आपणास कोणत्याही पदाची अपेक्षा राहिली नसल्याने आणि राजकारणातील एक विशिष्ट र्मयादा पूर्ण झाली असल्याने आपण आगामी लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages