आमदाराकडून पोलिसाला मारहाण / पोलिसांमध्ये तीव्र नाराजी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

आमदाराकडून पोलिसाला मारहाण / पोलिसांमध्ये तीव्र नाराजी

Share This
विधिमंडळाचे अधिवेशन सुरु असताना आवारात सुरक्षेसाठी तैनात पोलिसांना काही आमदारांकडून मारहाण केल्याचे प्रकरण चांगलेच तापले आहे. आमदारांच्या या मारहाणीमुळे विधिमंडळ परिसरात तैनात पोलिसांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी आज, मंगळवारी दुपारी विधिमंडळ परिसरात जाऊन नाराज पोलिसांची भेट घेतली.

बहुजन विकास आघाडीचे वसई येथील आमदार क्षितिज ठाकूर यांची काल, सोमवारी वांद्रे-वरळी सी लिंकवर पोलिसांनी गाडी अडवली होती. या प्रकारामुळे चिडलेल्या ठाकूर यांनी विधिमंडळ आवारात पोलिसांना मारहाण केली आहे.

विधिमंडळ परिसरात तैनात असलेल्या पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केल्याने अधिकारी संपप्त झाले आहे. तीन आमदारांनी एकत्र येऊन सहायक पोलीस निरिक्षक सचिन सूर्यवंशी यांना मारहाण केली असल्याचं सांगण्यात येत आहे.

आमदारांना अपमानास्पद वागणूक दिल्याच्या आरोपावरून एपीआय सूर्यवंशी यांच्यावर विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. यानंतर एपीआय सूर्यवंशी यांना मारहाण झाली असल्याचं सांगण्यात येत आहे. आमदार जयकुमार रावल, आमदार राम कदम आणि आमदार प्रदीप जैयस्वाल यांच्यावर एपीआय सूर्यवंशी यांना मारहाण केल्याचा आरोप आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages