अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या ९२४ घटना - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या ९२४ घटना

Share This
राज्यात २०१२ या वर्षात बलात्काराच्या एक हजार ७०४ घटना घडल्या असून त्यापैकी अल्पवयीन मुलींवर ९२४ बलात्कार झाले आहेत अशी धक्कादायक माहिती विधानसभेतील लेखी प्रश्नाच्या दिलेल्या उत्तराच्या निमित्ताने उघड झाली आहे. 

राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याबाबतचा प्रश्न अनिल कदम अमीन पटेल या आमदारांनी विचारला होता. त्याला गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिलेल्या लेखी उत्तरात ही माहिती पुढे आली आहे. राज्यातील २००५ ते २०११ या कालावधीत बलात्काराच्या एकूण दहा हजार ८३७ घटना घडल्या आहेत. २०१२ अखेर न्यायालयात बलात्काराची १४ हजार ४१४ विनयभंगाची ३१ हजार ४१२ तर छेडछाडीची ९ हजार ४८० प्रकरणे प्रलंबित असल्याची माहितीही या उत्तरात देण्यात आली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages