शासकीय योजना महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

शासकीय योजना महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Share This

581840_498384610196758_1017032550_n.jpg
3000 नागरिकांनी घेतला योजनांचा लाभ 
मुंबई /  केतन खेडेकर http://jpnnews.webs.com
महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाच्या विविध लोकोपयोगी योजनाची नागरिकाना माहिती व्हावी या उद्देशाने प्रगती प्रतिष्ठान तर्फे भव्य योजना महोत्सवाचे आयोजन चिंचपोकळी येथे करण्यात आले होते. त्यास विभागातील नागरिकांनी उपस्थीत राहून अनेक शासकीय योजनाचा लाभ घेतला. रविवारी दिवसभर पार पडलेल्या या कार्यक्रमाला जवळपास तीन हजार नागरिकांनी उपस्थिती दर्शवली होती. 

शासकीय योजना, विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण आणि इतर महत्त्वाचे प्रमाणपत्र, ओळखपत्र काढण्यासाठी लागणारी माहिती देणारे 28 स्टॉल या महोत्सवात उभारले होते. या योजना महोत्सवात शेकडो अल्पसंख्याक विद्यार्थ्यांनी आय.टी.आय., संगणक, वाहनचालक अशा वेगवेगळ्या प्रशिक्षणासाठी नावनोंदणी केली. तर ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र, निराधार लोकांसाठी असलेल्या योजनांमुळे वृद्ध नागरिकांनीही मोठय़ा संख्येने महोत्सवाला हजेरी लावली होती.

    
कार्यक्रमाचे आयोजक आणि समाजसेवक रोहिदास लोखंडे यांनी विविध योजनांचा पाठपुरावा कशाप्रकारे करावा याची माहिती नागरिकांना दिली. तसेच ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र आणि अन्य योजनांच्या कागदपत्रांच्या फेरतपासणीची जबाबदारी स्वत:कडे घेत शासन कर्मचार्‍यांवरील ताण हलका केला. हा कार्यक्रम सकाळी नऊ ते सायंकाळी सहापर्यंत आयोजित करण्यात आला होता. मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कार्यक्रमाची वेळ सायंकाळी आठपर्यंत वाढवली. शासनाच्या विविध योजनांची लोकांना माहिती व्हावी या हेतूने प्रगती प्रतिष्ठानतर्फे हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. अशी माहिती प्रगती प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि ज्येष्ट समाजसेवक रोहिदास लोखंडे यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages