घाटकोपरमध्ये महिलेला जिवंत जाळले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

घाटकोपरमध्ये महिलेला जिवंत जाळले

Share This
राजावाडी रुग्णालयात मृत्यूशी झुंजमुंबई - घाटकोपरमधील चिरागनगर परिसरात एका महिलेला जिवंत जाळण्याचा अमानुष प्रकार घडला. ही महिला ७५ टक्के भाजली असून राजावाडी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. कॉंग्रेस नगरसेवक प्रवीण छेडा यांच्या बॉडीगार्डचा या प्रकरणात हात असल्याचा आरोप या महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे. 

सीताबाई असे या महिलेचे नाव आहे. विद्याविहार पश्‍चिम येथील बसडेपोच्या बाजूला गेल्या पाच वर्षांपासून ती अंडी विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवते. होळीच्या दिवशी सीताबाई यांची मुलगी सोनी अलकुंटे हिच्याबरोबर होरील शाह, नगरसेवक प्रवीण छेडा यांचा बॉडीगार्ड महेश काळे, कल्पना शेख, रंजना शेख, मीना काळे आणि सुमन खंदारे यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. त्या वादातून या सहाजणांनी भररस्त्यात मारहाण केल्याचा आरोप सोनी हिने केला आहे. 

याप्रकरणी चिरागनगर पोलीस चौकीत तक्रार करायला गेले असता कुणीही दाद दिली नाही असे सोनी हिचे म्हणणे आहे. त्यानंतर वरील सहाजण धुळवडीच्या दिवशी पहाटे आपल्या घरात घुसले आणि त्यांनी आई सीताबाई हिला जिवंत पेटवले असा सोनी हिचा आरोप आहे. काळे हा फरारी झाला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages