१ एप्रिलपासून मुंबई बनणार 'बॅनरमुक्त' शहर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

१ एप्रिलपासून मुंबई बनणार 'बॅनरमुक्त' शहर

Share This
मुंबई / http://jpnnews.webs.com :
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला अनधिकृत बॅनरबाजीने विद्रूप करणार्‍यांवर येत्या १ एप्रिलपासून कठोर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. राजधानी नवी दिल्लीच्या कार्यप्रणालीचे अनुकरण करत बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाने १ एप्रिलपासून शहरातील सर्व अनधिकृत होर्डिंग्ज हटवण्याची योजना आखली आहे. या मोहिमेंतर्गत होर्डिंग्ज उभारणार्‍यांवर महाराष्ट्र मालमत्ता विद्रूपीकरण प्रतिबंधक कायदा, १९९५ आणि मुंबई पालिका कायदा, १९८८ अन्वये कारवाई केली जाणार आहे.

शहरात राजकीय पक्ष तसेच विविध संघटनांची मोठय़ा प्रमाणावर बॅनरबाजी सुरूच आहे. या बॅनरबाजीला चाप लावण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने बृहन्मुंबई महापालिका प्रशासन आणि राजकीय पक्षांना अनेकदा ताकीद दिली. मात्र त्याचा बॅनरबाजी करणार्‍यांवर कोणताच परिणाम जाणवला नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाने आता बॅनरबाजी करणार्‍यांवर कठोर कारवाईची योजना आखली आहे. शहरात परवानगी घेऊन उभारल्या जाणार्‍या होर्डिंग्जवर कारवाई केली जाणार नाही; परंतु आपल्या पक्षाच्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी राजकीय कार्यकर्त्यांकडून उभारल्या जाणार्‍या बॅनर्सवर कठोर कारवाई केली जाईल, असे महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages