विकिपीडियाला हवी आर्थिक मदत। - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

विकिपीडियाला हवी आर्थिक मदत।

Share This

मुंबई  / रशीद इनामदार ( http://jpnnews.webs.com/)

ना नफा ना तोटा तत्वावर चालणारी ,जगातील व्यक्ती,ठिकाणे ,वस्तू इत्यादी सर्व बाबींची ज्ञानाच्या दृष्टीकोनातून महत्वाची असलेली माहिती पुरवणारी संस्था विकिपीडिया सध्या आर्थिक विवंचनेत आहे. त्यांच्या विकिपीडिया .कॉम या संकेस्थळावरून आपल्याला आवश्यक असलेली जवळ जवळ सर्वच माहिती मिळते आणि हे संकेतस्थळ विनामुल्य आहे . या संस्थेमध्ये १५० कर्मचारी काम करतात . जगभरामध्ये ४५० दशलक्ष वाचक या संकेस्तस्थलावरील  माहितीचा वापर नियमित करत असतात . त्यासाठी लागणारे सर्वर्स,वीज,भाडं आणि कर्मचारी आणि त्यासाठी येणारा खर्च अवाढव्य आहे.

               हे संकेतस्थळ एक अशी जागा आहे जिथे तुम्ही विचार करू शकता आणि कोणत्याही गोष्टीचा ज्ञान मिळवू शकत.आम्ही आमचं कामाचं स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी कोणतीही जाहिरात आमच्या संकेतस्थळा वर लावणार नाही . आम्ही कोणतेही सरकारी मानधन अथवा मदत हि घेत नहि. आम्ही सरासरी १५०० रुपये मदतीवर हि संस्था चालवत आहोत . जर तुम्ही प्रत्येकी १०० रुपये जरी मदत केली तरी आणखी एक वर्ष आम्ही तुमची सेवा करू शकू . आम्हाला मदत करा जेणेकरून आम्हाला निधी गोल करण्याची आवश्यकता पडणार नाही असे विकिपीडिया चे संस्थापक जिमी वेल्स यांनी वाचकांना केले आहे .

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages