लोकशाही दिन कार्यक्रमात नगरसेवकांचाही समावेश करावा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

लोकशाही दिन कार्यक्रमात नगरसेवकांचाही समावेश करावा

Share This
मुंबई / http://jpnnews.webs.com : 
पालिका प्रशासनाकडून नागरी समस्या सोडविण्यासाठी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. या बैठकीत नागरिकांच्या समस्या ऐकून त्यावर उपाययोजना करण्यात येतात, मात्र या बैठकीत लोकप्रतिनिधींचा समावेश नसतो. लोकप्रतिनिधी आणि जनतेमध्ये समस्यांसंबंधात समन्वय साधताना गैरसमज निर्माण होऊ शकतो. हे टाळण्यासाठी लोकशाही दिन या उपक्रमामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून नगरसेवकांचाही समावेश करण्यात यावा, अशी मागणी भाजपा नगरसेवक ज्ञानमूर्ती शर्मा यांनी ठरावाच्या सूचनेनुसार केली.

प्रशासनाकडून विभाग पातळीवर दर महिन्याच्या दुसर्‍या सोमवारी लोकशाहीदिन आयोजित करण्यात येणार असून या वेळी प्रशासन नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी नागरिकांसमवेत बैठका घेण्यात येणार आहेत. मात्र या बैठकीत नगरसेवकांचा समावेश करण्यात आलेला नाही. प्रशासनाकडून आयोजित या बैठकीत नगरसेवकांचाही समावेश होणे आवश्यक आहे. जेणेकरून प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिक एकत्रितपणे सहभागी झाल्यामुळे समन्वय साधला जाऊन प्रभागातील नागरी विकासाची कामे त्वरेने करणे सोपे जाईल, असे ज्ञानमूर्ती शर्मा यांचे म्हणणे आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages