ब्लॅकबेरीचे सर्व्हर ताब्यात घेण्याची तयारी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

ब्लॅकबेरीचे सर्व्हर ताब्यात घेण्याची तयारी

Share This
मुंबई / http://jpnnews.webs.com : 
देशाच्या सुरक्षिततेसाठी धोका ठरू शकणार्‍या ब्लॅकबेरी मोबाईल सेवेबाबत सरकार आता अधिक आक्रमक झाले असून ही सेवा पुरवणारी कंपनीची मुंबईतील सर्व्हर आणि तत्सम पायाभूत सुविधा यंत्रणा ताब्यात घेण्याची तयारी सरकारने सुरू केली आहे. यामुळे सरकार या कंपनीच्या इंटरनेट सेवेद्वारा चालणार्‍या संवादावर नियंत्रण ठेवू शकणार आहे.

दूरसंचार मंत्रालयाने केंद्रीय गुप्तहेर संघटनांद्वारा ब्लॅकबेरीच्या विभिन्न सेवांचा तपास केल्यानंतर विभागी पत्राद्वारा एक शिफारस केली आहे. त्यानुसार रीम (रीसर्च इन मोशन) कंपनीद्वारा मुंबईत उभारण्यात आलेल्या सर्व्हर आणि पायाभूत सुविधा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. त्यासाठी केंद्रीय दूरसंचार मंत्रालय आणि रीम कंपनी यांच्या एक करार होण्याची शक्यता आहे. रीम कंपनी ब्लॅकबेरी ब्रँड नावाने स्मार्टफोनची निर्मिती करते. भारत सरकार आणि कंपनी यांच्यात भारतीय गुप्तहेर संघटनांकडून कंपनीची सेवा तपासण्याच्या मुद्दय़ावरून वाद सुरू आहे; पण भारत सरकारने कडक कारवाई करण्याचा पवित्रा घेतल्यानंतर या कंपनीने गुप्तहेर संघटनांना सेवेची तपासणी करण्यास अनुमती देण्याची तयारी दर्शवली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages