एकीकडे महिलांची सुरक्षितता अबाधित राहावी म्हणून कडक कायदा करण्याच्या हालचाली सुरू आहेत, तर दुसरीकडे रेल्वेतून प्रवास करणे महिलांसाठी असुरक्षित बनले आहे. सुरक्षा कर्मचारी तैनात असतानादेखील बलात्कार, छेड काढणे, विभयभंग अशा घटनांत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने रेल्वेने प्रवास करणे महिलांना त्रासदायक ठरू लागले आहे. अशा प्रकारच्या घटनांत २0१२च्या तुलनेत दुपटीने वाढ झाली असून, गेल्या वर्षी तब्बल २१0 गुन्ह्यांची नोंेद करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
रेल्वे मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार २0१0 मध्ये महिलांविरोधी दाखल झालेल्या गुन्ह्यांची संख्या ८५ असून १२0 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. २0११ मध्ये एकूण १२७ गुन्ह्यांप्रकरणी १४६ जणांना अटक करण्यात आली असून २0१२ मध्ये २१0 प्रकरणांत १७0 आरोपींना अटक करण्यात आली आहे. महिलांची छेड काढण्याचे प्रकार तर रेल्वेत नेहमीच घडतात. या प्रकरणी २0१0 मध्ये ५२, २0११ मध्ये ७२ आणि २0१२ मध्ये ११९ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. तसेच बलात्कारप्रकरणी २0११ मध्ये ३ आणि २0१२ मध्ये ७ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. विनयभंगप्रकरणी २0१0 मध्ये ३३, २0११ मध्ये ५२ आणि २0१२ मध्ये ८४ गुन्हे दाखल करण्यात आले.

छेडछाडीप्रकरणी २0१२ मध्ये सर्वाधिक ४५ गुन्ह्यांची नोंद दक्षिण रेल्वे विभागात दाखल झालेले असून, पश्चिम रेल्वे विभाग दुसर्या क्रमांकावर आहे. या विभागात १९ गुन्ह्यांची नोंद आहे. रेल्वेने महिलांचा प्रवास सुरक्षितरीत्या व्हावा म्हणून सरकारने चांगल्या उपाययोजना आखलेल्या आहेत.दररोज देशातील विविध मार्गावरून हजारो गाड्या धावतात. त्यातील १ हजार २७५ रेल्वे गाड्यांतील सुरक्षिततेची जबाबदारी रेल्वे सुरक्षा दलाकडे (आरपीएफ) असून, २ हजार २२0 रेल्वे गाड्यांची सुरक्षा गव्हर्नमेंट रेल्वे पोलिसांकडे सोपविण्यात आली आहे. एवढेच नाही तर काही उपनगरीय मार्गावर महिलांसाठी विशेष गाड्या सोडण्यात आल्या असून, त्यात महिला सुरक्षा रक्षकांना तैनात करण्यात आले आहे. रेल्वेत अप्रिय घटना घडल्यास सुरक्षा हेल्पलाईनची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे, अशी माहिती रेल्वे मंत्रालयातील वरिष्ठ अधिकार्याने दिली.

No comments:
Post a Comment