पालिकेने दिल्लीकडून काहीतरी शिकावे ! - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पालिकेने दिल्लीकडून काहीतरी शिकावे !

Share This

आरपीआय आठवले गटाच्यावतीने रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली नुकताच नवी दिल्ली येथे संसद भवनावर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाच्या वृत्तसंकलनासाठी नवी दिल्ली येथे जाण्याची संधी मिळाली. मुंबईमधून दिल्लीला जाताना दिल्लीबाबत कित्तेक वाईट अनुभव लोकांनी  दिल्ली खूपच खराब शहर असावे अशी समज झाली होती. परंतू दिल्ली येथे गेल्यावर मुंबईपेक्षा कित्तेक पटीने दिल्ली बरी असा अनुभव आला. 

आपल्या मुंबई मध्ये प्रत्तेक रस्त्यावर गल्लीमध्ये स्थानिक राजकीय नेते, मुंबई महानगर पालिकेचे अधिकारी, मुंबई पोलिस यांना पैशांनी विकत घेवून सर्वत्र अनधिकृत बांधकाम केलेले निदर्शनास येते. कित्तेक ठिकाणी तर राजकीय नेत्यांनीच आपल्या मतांसाठी अनधिकृत बांधकामे करून दिली आहेत. 

मुंबई मध्ये प्रत्येक रस्त्यावर पालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना, मुंबई पोलिसांना हप्ते देवून अनधिकृत फेरीवाल्याणी मुंबई मध्ये उच्छाद मांडला आहे. मुंबईच्या नागरिकांना चालता येईल असा कोठेही मुंबई मध्ये फुटपाथ फेरीवाल्यांनी बाकी ठेवलेला नाही. अशा फेरीवाल्यांकडून फुटपाथ आणि रस्त्यावरच आपले बस्तान बसवले दिसते. मुंबई मध्ये रस्त्यांवर नागरिकांसाठी शौचालये सुद्धा नसल्याने मुंबई मध्ये सर्वत्र घाण पसरलेली दिसते. 

मुंबई मधील राजकीय व सामाजिक संघटनांनी मुंबई आपल्या बापाच्या मालकीची असल्या प्रमाणे गल्ली, चौक, रेल्वे स्टेशन, महत्वाचे रस्ते वाढदिवस, कार्यक्रम यांच्या निमित्ताने लावलेल्या पोस्टर, ब्यानरने व्यापलेले दिसतात. यामुळे मुंबई मात्र भकास दिसत आहे. यासर्व प्रकारामुळे मुंबई उच्च न्यायालयाला दखल घेवून पालिकेला चपराक मारत अनधिकृत ब्यानर एका दिवसात खाली उतरवण्याचे आदेश द्यावे लागले होते. 

मुंबई मध्ये कंत्राटदाराला पोसण्यासाठी रस्ते दुरुस्ती, रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी कंत्राट दिली जात असल्याने व यामधील लोकप्रतिनिधीना टक्केवारी मिळत असल्याने मुंबईचे रस्ते खड्डेमय झालेले दिसतात तसेच रस्त्यांचे काम चांगल्या प्रकारे झालेले दिसत नाही. मुंबई मध्ये फक्त फुटपाथवर पेव्हरब्लॉक लावावे असे आदेश असताना सर्वत्र कंत्राटदाराच्या सोयीसाठी पेव्हरब्लॉक लावून रस्ते बनवले जात असल्याने कालांतराने या रस्त्यांचा समतोल बिघडलेला दिसतो. 

याऊलट दिल्ली मध्ये मोठ मोठे व स्वच्छ रस्ते दिसतात. दिल्ली मध्ये एकही रस्ता पेव्हरब्लॉक लावलेला दिसलेला नाही. दिल्लीमध्ये मोठमोठे रस्ते असले तरी त्या रस्त्यांवर कोठेही खड्डे पडलेले निदर्शनास आलेले नाही. दिल्लीमध्ये कोठेही रस्त्याच्या बाजूला किवा पदपथावर कोठेही कशेही फेरीवाले बसलेले नसल्याने दिल्ली वासियांना पदपथावरून चालण्याची चांगली सोय होती. प्रत्येक रस्त्यावर थोड्या थोड्या अंतरावर नागरिकांसाठी शौचालये बांधली असल्याने दिल्लीमध्ये मुंबईमध्ये जशी घन पसरलेली दिसते तशी घाण पसरलेली दिसत नव्हती. दिल्लीमध्ये कोठेही गल्लीमध्ये, चौकांमध्ये मुख्य रस्त्यांवर ब्यानर, पोस्टर लावलेली दिसत नसल्याने दिल्ली शहर आणि दिल्लीकर मोकळा श्वास घेताना दिसत होते. 

एकीकडे भारताची आर्थिक राजधानी असलेली मुंबई आणि राजकीय राजधानी असलेली दिल्ली यामध्ये जमीन आसमानाचा फरक जाणवत होता. मुंबई भारताची आर्थिक राजधानी असल्याने व मुंबई महानगर पालिकेचे बजेट दिल्ली महानगर पालिकेपेक्षा कित्तेक पटीने जास्त असल्याने मुंबई दिल्ली पेक्षा कित्तेक पटीने सुंदर शहर असायला हवे होते. परंतू याच्या उलट चित्र पहावयास मिळाल्याने मुंबई महानगर पालिकेतील सत्ताधार्यांनी मुंबई शहर स्वछ ठेवण्यासाठी व मुंबईकरांना चांगल्या सुविधा देण्यासाठी दिल्लीकडून काहीतरी शिकणे गरजेचे आहे. 

अजेयकुमार जाधव 
मो. 09969191363

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages