पालिका रुग्णालयांत 'एचबीओटी'ची सुविधा देण्याबाबत प्रशासन उदासीन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पालिका रुग्णालयांत 'एचबीओटी'ची सुविधा देण्याबाबत प्रशासन उदासीन

Share This
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये अनेक अपघात झालेले रुग्ण गंभीर अवस्थेत येत असताना या वेळी एचबीओटी (हायबर बॅरिक ऑक्सिजन थेरपी)ची नितांत आवश्यकता असते. असे असतानाही भारतात केवळ ३0 ठिकाणी एचबीओटीची केंद्रे आहेत. यासंदर्भात पालिकेच्या पूर्व व पश्‍चिम उपनगरातील प्रत्येकी दोन रुग्णालयांत एचबीओटी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतचा आपला ठराव पालिका सभागृहात मंजूर होऊनही पालिका प्रशासनाकडून अद्यापि याबाबत काय कार्यवाही झाली, हेही आपणास कळविलेले नसून ही गंभीर बाब असल्याचे राष्ट्रवादीच्या नगरसेविका सईदा खान यांनी आयुक्तांना पत्राद्वारे कळविले आहे.

एचबीओटी सुविधा रुग्णालयात उपलब्ध नसल्यास अपघातग्रस्त गंभीर रुग्णास उपचार देणे शक्य होत नसल्याने त्याला ज्या रुग्णालयात ही उपचार पद्धती उपलब्ध असेल, त्या ठिकाणी हलविण्यास सांगितले जाते. परंतु या मधल्या वेळेत रुग्णाच्या जीवास धोका संभवतो. त्याचप्रमाणे ज्या रुग्णावर मधुमेहामुळे पाय कापण्याची वेळ येते, अशा वेळीही या एचबीओटी सुविधेची अत्यंत आवश्यकता असल्याचे सईदा खान यांनी सांगितले.

पालिकेच्या सन २0१२-१३ च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात एकूण ३४ कोटी २५ लाख इतकी तरतूद असतानाही केवळ ७ कोटी ९१ लाख ८ हजार २७३ रुपये खर्च झाले. पालिकेकडे एवढा निधी असतानाही नायर रुग्णालयाच्या संबंधित अधिकार्‍यांनी पुढील वर्षाच्या अर्थसंकल्पात एचबीओटीची यंत्रणा खरेदी करण्यासाठी तरतूद केली जाणार असल्याचे सांगितले आहे.दरम्यान यासंदर्भात पालिका प्रशासनाने ही यंत्रणा या वर्षाच्या बाकी असलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून त्वरित खरेदी करण्यात यावी, अशी मागणी सईदा खान यांनी आयुक्तांकडे केली आहे. त्याचप्रमाणे याप्रकरणी आपण विशेष लक्ष घालून ठरावाच्या सूचनेबाबत अभिप्राय देण्याबाबत योग्य ते आदेश संबंधितांना देण्यात यावेत, अशी विनंती सईदा खान यांनी आयुक्तांना केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages