देशात २८ लाख कॅन्सरग्रस्त - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

देशात २८ लाख कॅन्सरग्रस्त

Share This

नवी दिल्ली : गेल्या १0 वर्षांत सबंध देशभरात सर्व प्रकारच्या कॅन्सरग्रस्त रुग्णांची संख्या २८ लाख २0 हजार १७९ वर जाऊन पोहचली आहे. विशेष म्हणजे यात फुफ्फुसाच्या कॅन्सरने त्रस्त असलेल्या १ लाख ७८ हजार ५५४ रुग्णांचा समावेश असल्याची माहिती शुक्रवारी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री गुलाम नबी आझाद यांनी दिली. सिगारेट, बिडी, तंबाखूसह अनेक व्यसनांमुळे मनुष्याला कॅन्सरसारख्या गंभीर आजाराची लागण होते. यासंदर्भात सरकार सातत्याने जनजागृतीदेखील करते. मात्र, लोक त्याविषयी गांभीर्य घेत नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी, या आजाराच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. या आजारासंदर्भात सुरुवातीलाच लक्षणे दिसून आल्यास त्यावर चांगल्या प्रकारे इलाज होऊ शकतो आणि त्या व्यक्तीचे वयोमानदेखील वाढू शकते. मात्र लवकर उपचार केले नाही तर मृत्यू अटळ आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages