३0 एप्रिलला एसटी संपाचा निर्णय - आ. छाजेड - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

३0 एप्रिलला एसटी संपाचा निर्णय - आ. छाजेड

Share This
मुंबई : एसटी महामंडळातील प्रस्तावित वेतन करारात १३ टक्के वेतनवाढ देण्यात आल्यामुळे सुमारे ७५ हजार कर्मचार्‍यांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे या १३ टक्के वेतनवाढीविरोधात येत्या ३0 एप्रिल रोजी पंढरपूर येथे राज्यस्तरीय बैठत घेण्यात येणार आहे. या बैठकीत संपाचा निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेसचे अध्यक्ष आ. जयप्रकाश छाजेड यांनी दिली.

एसटी महामंडळाचा अनेक दिवसांपासून रखडलेला वेतन करार १२ एप्रिल रोजी रात्री उशिरा केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या मध्यस्थीमुळे करण्यात आला. या वेळी राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एसटी कामगारांना १३ टक्के वेतनवाढ देण्याचा निर्णय घेतला. एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यांचा १ एप्रिल २0१२ ते ३१ मार्च २0१६ चा वेतन करार गेले अनेक दिवस रखडलेला होता. महामंडळाची आर्थिक स्थिती पाहता राज्य सरकारने १0 टक्के वेतनवाढ देण्याची तयारी दर्शवली होती. या १0 टक्के वेतनवाढीवर एसटीतील सर्वच संघटनांनी नाराजी व्यक्त केली होती. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी या प्रश्नावर तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी एसटी कामगारांना १३ टक्के वेतनवाढ देण्याचे मान्य केले; परंतु आजच्या महागाईच्या जमान्यात फक्त १३ टक्के वेतनवाढ अत्यंत कमी असून, कर्मचार्‍यांना २0 टक्के वेतनवाढ द्यायला हवी, अशी मागणी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेसचे छाजेड यांनी केली. 

मागच्या वेतन करारामध्ये एसटी कर्मचार्‍यांना १७.५ टक्के वेतनवाढ देण्यात आली होती, त्यामध्ये वाढ होण्याची आवश्यकता असताना ती कमी का करण्यात आली, असा प्रश्नही छाजेड यांनी केला आहे. राज्य शासनाने देऊ केलेली वेतनवाढ ही अत्यंत अल्प असल्यामुळे कर्मचार्‍यांमध्ये संतापाचे वातावरण असून, कर्मचारी संप करण्याच्या तयारीत असल्यामुळे संघटनेची ३0 एप्रिल रोजी पंढरपूर येथे राज्यस्तरीय बैठक घेण्यात येणार असून त्यामध्ये कर्मचार्‍यांच्या भावनांचा विचार करून तीव्र आंदोलनासह वेळप्रसंगी संपाचा निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचे छाजेड यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages