विद्यार्थी, कामगारांसाठी भारतीय स्टेट बँकेचे प्रीपेड कार्ड - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

विद्यार्थी, कामगारांसाठी भारतीय स्टेट बँकेचे प्रीपेड कार्ड

Share This
मुंबई : देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेने देशातील विद्यार्थी आणि कामगार वर्गासाठी प्रीपेड कार्ड सुरू केले आहे. या कार्डला 'स्टेट बँक ऑफ इंडिया स्मार्ट पेआऊट कार्ड' असे नाव देण्यात आले आहे. या कार्डमुळे मूलभूत बँकिंग सेवा उपलब्ध नसलेले कामगार, कंत्राटी मजूर, न कमावते कुटुंब सदस्य असे लोक आर्थिक सर्वसमावेश योजनेच्या आत समाविष्ट होणार असल्याचे एसबीआयचे डेप्युटी व्यवस्थापकीय संचालक आर. के. सराफ यांनी म्हटले आहे. 

या कार्डमध्ये एका वेळी दहा हजार आणि संपूर्ण महिन्यात २५ हजार रुपये लोड करण्यात येणार आहेत. सध्या ज्यांचे खाते या बँकेत आहे तेदेखील अँड ऑन सुविधा म्हणून हे कार्ड बाळगू शकणार आहेत. 

या कार्डची वैधता दहा वष्रे ठेवण्यात आली असून ते देताना बँक फक्त १0२ रुपये शुल्क आकारणार आहे. परक्या ठिकाणी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हे कार्ड फारच उपयुक्त ठरणार आहे. तसेच मालकवर्ग देखील आपल्या कर्मचार्‍यांचे वेतन या कार्डच्या माध्यमातून वितरित करू शकणार आहे. तसेच ही कार्ड मिळवण्यासाठी केवायसी नियमदेखील शिथिल करण्यात येणार आहे. हे कार्ड वापरण्यात कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचे सराफ यांनी स्पष्ट केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages