काँग्रेसची निवडणूक तयारी सुरू - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

काँग्रेसची निवडणूक तयारी सुरू

Share This

मुंबई : दक्षिण मुंबई काँग्रेस कमिटीच्या वतीने येत्या शनिवारी सायंकाळी ४ वाजता मथुरादास वेसनजी तेजपाल हॉल, ऑगस्ट क्रांती मैदानाशेजारी, ग्रॅण्ट रोड (प.) येथे कार्यकर्ता प्रशिक्षण आणि मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यकर्ता शिबिरात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे प्रमुख मार्गदर्शक असणार असून, शिबिराचा समारोप केंद्रीय राज्यमंत्री खासदार मिलिंद देवरा यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. पुढील वर्षी येणार्‍या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी या शिबिराचा उपयोग केला जाणार आहे. कार्यकर्ता शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, मुंबई अध्यक्ष जनार्दन चांदूरकर, वस्त्र उद्योगमंत्री आरिफ खान, महिला आणि बालविकास मंत्री वर्षा गायकवाड, आमदार मधू चव्हाण, अमिन पटेल, अँनी शेखर तसेच पालिकेतील विरोधी पक्षनेते ज्ञानराज निकम उपस्थित राहाणार आहेत. या शिबीर दक्षिण मुंबई काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुनील नरसाळे यांनी आयोजित केले असून, या शिबिरात काँग्रेसचे सर्व स्थानिक नेते, नगरसेवक आदी उपस्थित राहणार आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages